मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील घटकपक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. शातच महायुतीतील भाजपने शिंदे आणि पवारांचं टेन्शन वाढवलं आहे. आगामी विधानसभेत भाजप महायुतीतून सर्वाधिक जागा लढवणार, असा निर्णय झाल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीला आता अवघ्या काही दिवसांचाच कालावधील शिल्लक आहे. त्यामुळे राजकीय नेते आतापासूनच तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमधील घटकपक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. अशातच भाजप महायुतीतून सर्वाधिक जागा लढवणार, असा निर्णय झाल्याची माहिती आहे.
रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभेत भाजप तब्बल 160 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
यापैकी 125 जागांवर त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 64 जागा मिळणार असल्याचं असल्याचं कळतंय. गेल्या निवडणुकीतही भाजपने 150 हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी 105 जागांवर त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळेच सध्या भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.















Discussion about this post