मुंबई । लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेंच सुरू असतानाच आता मुख्यमंत्रिपदावरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये जुंपली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची घेतल्याची सूत्राची माहिती आहे. ज्याच्या सर्वाधिक जागा, त्याचा मुख्यमंत्री, हे सूत्र मान्य नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच एका सभेत म्हटलं आहे. यामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातील अशी भितीही त्यांनी व्यक्त केली होती.
१६ तारखेच्या महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत त्या चेहऱ्याला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतु यावर काँग्रेस आणि शरद पवार गटाने ठोस उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे पुन्हा आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे.















Discussion about this post