जळगाव । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, जळगावच्या सागर पार्क येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संबोधित करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबत विधान केलं.
गुलाबी रंगावरही गुलाबराव पाटील बोलते झाले आहेत. घड्याळ , धनुष्यबाण आणि कमळ येथे तिघे एकाच व्यासपीठावर असल्यामुळे टेन्शन नाही. अजितदादा आम्ही तुमची काळजी घेतली आहे. तुमचा गुलाबी कलर आम्ही समोर बसवला आहे. त्यामुळे अजितदादा पुढच्या काळात आपलं 100% भलं झाल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमात बोलताना बहिणींवर चारोळी म्हटली आणि मुख्यमंत्र्यांचा शिंदे उर्फ एकनाथरावजी मामा असा केला उल्लेख केला. मी प्रथमतः आदरणीय शिंदे साहेबांचं आपल्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो.दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आपल्या बहिणींच्या मागे जन्मभर उभा राहील, अशा पद्धतीने शपथ खाणारे आपण सगळे भाऊ… त्याच पद्धतीने बहिणींच्या भावांच्या पाठीशी उभा राहण्याची शपथ घेतलेले हे आपले तिन्ही नेते आज जळगावमध्ये आले आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.















Discussion about this post