जळगाव । जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे व हैदराबाद या तीन शहरांना सेवा पुरवणाऱ्या फ्लाय ९१ कंपनीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. त्यामुळे विमान कंपनी आगामी नियोजन सुरू असलेल्या वेळापत्रकात गोवा-जळगाव-हैदराबाद या रूटवर दररोज विमान सेवा देणार आहे. या वेळापत्रकानुसार यंदा धनत्रयोदशीपासून जळगावातून दररोज गोव्याला जाता येणार आहे.
फ्लाय ९१ कंपनीतर्फे उडान ५.० योजनेंतर्गत जळगावातून गोवा, हैदराबाद व पुणे या तीन शहरांना सेवा पुरवली जाते. त्यात गोवा-जळगाव-हैदराबाद या रूटवर आठवड्यातून तीन दिवस तर गोवा-जळगाव-पुणे या रूटवर चार दिवस फ्लाइट आहे. कंपनीतर्फे आगामी तीन महिन्यांचे वेळापत्रक नागरी उद्यान मंत्रालयाकडे पाठवले असून, ते २७ ऑक्टोबर ते २९ मार्च २०२५ या कालावधीचे आहे. या वेळापत्रकात गोवा-जळगाव-हैदराबाद या रूट्ससाठी कंपनीने दररोज विमानसेवा प्रस्तावित केली आहे. त्यामुळे जळगावकरांना रोज गोव्याला जाता येईल. सध्या गोव्यासाठी जी विमानसेवा सुरू आहे तिला शहरातील व्यावसायिक, व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर रोज विमानसेवेचे नियोजन केले जाते आहे.















Discussion about this post