मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे केलेल्या टीकेचा आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तुम्ही विसरलात? मला फार बोलायला लावू नका. तुम्ही आणि मी काय आहोत हे आपल्या दोघांनाही माहीत आहे, असा सूचक आणि गंभीर इशाराच संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
संजय राऊत हे शरद पवार यांच्या अमंग कार्यातील करवली आहेत. शरद पवार यांची सोंगटी आहे, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी काल संभाजीनगर येथे केली. आता या टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. अनुभवी नेते आहेत. जाणकार आहेत. देशाचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना भेटत असतो. पण कधीकाळी तुम्हीही शरद पवारांचे उंबरठे झिजवत होतात. विसरलात? तुम्ही शरद पवार यांच्या उंबरठ्यावर जाऊन बसत होतात. फार बोलायला लावू नका. आपण काय आहोत हे दोघांना माहीत आहे. त्यामुळे मला बोलायला लावू नका, असा गंभीर इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
करवली असेल ना. तुम्ही कुठे आहात? आम्ही कुणाच्या सुपाऱ्या तर घेत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा मी निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हे त्यांनाही माहीत आहे. तेही मान्य करतील. पक्षाबरोबर निष्ठेने राहणे काही लोकांच्या पोटात दुखत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी केला.















Discussion about this post