नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या नोकरीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. १० वी पास ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
कार्यकारी सहाय्यक पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १० वी पास, वाणिज्य/ विज्ञान/ कला शाखेतील पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीत निवड झालेल्या उमेदवारांना २२,००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
१८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सहाय्यक कार्यकारी पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवाराला इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची परीक्षा पास करावी लागेल. उमेदवाराने MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराला ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेनटेशन,डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल,इंटरनेट याबाब उत्तम ज्ञान असावे.
या नोकरीसाठी अर्जासोबतच तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा,एसएससी गुणपत्रिका, ओळख पुरावा, पदवी परीक्षेची गुणपत्रिका, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो जोडणे आवश्यक आहे.
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज बा.य.ल.नायर धर्मा. रुग्णालय,डॉ.ए.एल.नायर रोड,मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८ या पत्त्यावर करायचा आहे.















Discussion about this post