मुक्ताईनगर । तालुक्यातील वडोदा येथे एका १४ वर्षीय मुलीने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. २६ जुलै रोजी सकाळी मृत्यू झाला आहे. प्रिया नागार्जुन खरगे (वय १४, रा.वडोदा ता. मुक्ताईनगर) असे मयत बालिकेचे नाव असून याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, वडोदा येथे प्रिया खरगे ही आई, वडील, दोन भाऊ यांच्यासह वास्तव्यास असून तिचे वडील नागार्जुन हे शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. प्रिया खर्गे ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता नववीत शिकत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान रविवारी दि. २१ जुलै रोजी राहत्या घरी असताना तिने काहीतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
कुटुंबीयांच्या लक्षात येत असताच तातडीने तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी अतिदक्षता विभागात तिच्यावर गेल्या पाच दिवसापासून उपचार सुरू होते. (केसीएन)दरम्यान शुक्रवारी दि. २६ जुलै रोजी सकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. यावेळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे वडोदा गावात शोककळा पसरली आहे.















Discussion about this post