मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र याच दरम्यान, अनेक पक्षात पक्षांतर होताना दिसत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुरानी हे लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. तसे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. बाबाजी दुरानी यांनी काल परभणीत शरद पवार यांची भेट घेतली होती. आज त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जयंत पाटील यांची देखील भेट घेतली आहे. मी मनाने शरद पवार साहेबांसोबतच असल्याचं बाबाजानी दुरानी यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
माध्यमांसोबत बोलताना बाबाजानी दुरानी म्हणाले, “शरद पवार यांची भेट घेण्याचं मुख्य कारण म्हणजे भविष्यात मला पवार साहेबांसोबत काम करण्याची इच्छा आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणे याचा अर्थ प्रवेश झाल्यासारखाच आहे. मी १९८५ पासून शरद पवार साहेबांसोबत आहे. यापूर्वी सुद्धा मी एका विचाराने काम केलेलं आहे”.
“समविचारी पक्षासोबत काम करायला सोपं जातं. भिन्न भिन्न विचाराचे पक्ष असले तर त्या ठिकाणी थोडं काम करायला अवघड जातं. कार्यकर्त्यालाही अवघड जातं आणि मतदारालाही अवघड जातं. अजित पवार सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानेच काम करतात. पण त्या ठिकाणी दोन्ही बाजूने जे पक्ष आहेत. त्याच्यामुळे सगळेच आमच्यासारखे अल्पसंख्यांक विचाराच्या कार्यकर्त्याच विटंबना होत असल्यासही दुर्राणी म्हणाले”.















Discussion about this post