जामनेर । जामनेर तालुक्यातील एक गावातून तरुणीवर झालेल्या अत्याचाराची एक संतापजनक घटना समोर आलीय. तरुणी कुडाच्या बाथरूमध्ये अंघोळ करीत असतांना संशयित आरोपीने तिला जबरदस्तीने उचलून नेत तिच्यावर घरात अत्याचार केला. याप्रकरणी एकाविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात राहणार १८ वर्षीय तरुणी हि २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिच्या घराच्या बाहेर असणाऱ्या कुडाच्या बाथरूम मध्ये अंघोळ करीत असतांना पीडित तरुणीच्या घरामागे राहणारा सुरेश रामदास भिल याने अचानक बाथरूम मध्ये येऊन पीडितेला उचलून घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन तिच्यावर अत्याचार केला.
याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिल्यावरून सुरेश भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहे.















Discussion about this post