जळगाव । जळगावमध्ये मुलांच्या मध्यान्न भोजनामध्ये चक्क मेलेला उंदिर आढळला आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत असे की, नशिराबादच्या अंगणवाडीत नेहमीप्रमाणे मिळालेल्या पोषण आहाराचं पाकीट एका गृहिणीने उघडलं. मात्र, पाकीटातील दृश्य पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण, चिमुकल्याच्या खाऊत चक्क मेलेले उंदराचे पिल्लू आढळलं. मिक्स तांदुळाच्या पाकिटात हा उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान हा प्रकार लक्षात आला. पोषण आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर आढळल्याने अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघडकीस झाला आहे.















Discussion about this post