अमळनेर । खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एका ४७ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष हिरामण मिस्तरी असं मृताचे नाव असून ही घटना अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथे घडलीय. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला दोघेही सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील बोदर्डी येथील रहिवाशी मृत संतोष मिस्तरी यांच्या पत्नी मंजुळाबाई मिस्तरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संतोष मिस्तरी यांनी गावातील अशोक दयाराम चौधरी यांच्याकडून २० हजार व मुडी येथील भालेराव गोविंदा महाजन यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते.(केसीएन)संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करून २० हजाराचे आठवड्याला दोन हजार व १५ हजाराचे महिन्याला तीन हजार असे व्याज देत होते. मात्र दोघेही घरी येवून व्याजाचे पैसे का देत नाही अस सांगत त्रास देत असत. तसेच त्या दोघांनी वेळोवेळी सुतारकाम करण्याचे साहित्य, बजाज पल्सर कंपनीची दुचाकी, तसेच घरातील वस्तू उचलून नेल्या आहेत.
दिनांक २० जुलै रोजी सायंकाळी अशोक चौधरी व भालेराव महाजन हे दोघे फिर्यादीच्या घरी आले व तू चालू हप्त्याचे व्याज दिले नाही असे म्हणू लागले. यावर फिर्यादीचे पती संतोष मिस्तरी यांनी, व्याज देवूनही तुम्ही घरच्या वस्तू, मोटरसायकल, मिस्तरी कामाच्या वस्तू उचलून नेल्या आहेत असे सांगितले त्याचा त्यांना राग घेऊन त्यांनी शिवीगाळ केली व धमकी देवून गेले. त्यावेळी आजूबाजूचे सर्व लोक जमा झाले होते.
या धमक्यांमुळे संतोष मिस्तरी रात्री उशिरापर्यंत जागे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते रूममध्ये दिसून आले नाहीत. म्हणून त्यांची पत्नी मागच्या खोलीमध्ये गेली असता त्यांनी मागील रूममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.याबाबत मारवड पोलीस स्टेशनला अशोक चौधरी व भालेराव महाजन या खाजगी सावकारांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय शितलकुमार नाईक हे करीत आहेत. दरम्यान खाजगी सावकारांच्या त्रासामुळे इसमान आत्महत्या केल्याने अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.















Discussion about this post