महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आज बुधवारी पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून त्यामुळे नागरीक भयभीत झाले. हिंगोली, परभणी, नांदेडसह वाशिम या जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने के आहे.
आज सकाळी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 7.14 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. नांदेड मध्ये भूकंपाची 4 पूर्णांक 05 अशी रिस्टर स्केलवर नोंद झाली आहे. या धक्यांने नागरिक भयभीत झाले असून घराबाहेर आले आहेत.
विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पैठण तालुक्यातील पाचोड येथे सकाळी 7:15 मिनीटाला धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातही भूंकपाचे धक्के जाणवले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. 2 महिन्यांपूर्वी सुद्धा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि आजूबाजूच्या भागात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तर रामेश्वर तांडा भागतही भूंकपाचे हादरे बसले होते.
आज हिंगोली शहर व हिंगोली सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रि्श्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.















Discussion about this post