मुंबई । मंत्रालयात आज खळबळजनक घटना घडली. एका वृद्धाने पाचव्या मजल्यावर खिडकीतून बाहेर पडत खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. या वृद्धाची पोलिसांनी प्रचंड समजूत काढली. तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने पाचव्या मजल्यावर चढून वृद्धाचे प्राण वाचवले. अरविंद नारायण पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे.
मंत्रालयात अनेक चकरा मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शालेय शिक्षण विभागात ते कामानिमित्त आले होते. वारंवार येऊन काम होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. कराड चिपळून रस्त्यात जागा गेली आहे. त्याबाबत ते आले असल्याचं सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/bharatjadhav891/status/1810618944413163685
दरम्यान, पाचव्या मजल्यावर खिडकीतून बाहेर पडत खाली बसले. यावेळी परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकाला समजवण्याचा प्रयत्न केला. या ज्येष्ठ नागरिकाला उतरवण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरीही संबंधित ज्येष्ठ व्यक्ती संतापलेला होता. त्याने पोलिसांच्या विनंतीचा विचार केला नाही. ही व्यक्ती पोलिसांसमोर आपली भूमिका मांडत राहिली. घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने या व्यक्तीजवळ जात त्याचे प्राण वाचवण्याचं काम केलं.















Discussion about this post