मुंबई । संध्या मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधान परिषदेत सोमवारी १ जुलैला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केली. असा आरोप भाजप कडून करण्यात येत आहे.या घटनेचा पडसाद आजही विधान परिषदेच्या सभागृहात बघायला मिळाला. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं.
नेमकं प्रकरण काय?
लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर निषेध ठराव मंजूर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. तसेच राहुल गांधी यांच्या भाषणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. यामध्ये आमदार प्रसाद लाड आणि भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश होता. यावेळी अंबादास दानवे यांनी लोकसभेत झालेल्या घडामोडींवर विधान परिषदेत चर्चा करण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी अंबादास दानवे यांना विरोध केला. यामुळे वैतागलेल्या दानवेंनी भर सभागृहात आपल्या जागेवरुन बाजूला होत आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावेळी प्रसाद लाड यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत शिवीगाळ केली.















Discussion about this post