तुम्हीही महाराष्ट्र वनविभागात नोकरी मिळण्याची संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. नागपूर वनविभागात रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे.११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर ही भरती करण्यात येणार आहे. याबाबत सर्व माहिती https://mahaforest.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
नागपूर वनविभाग कार्यालयात ही जाहिरात देण्यात आली आहे. उमेदवारांडून ऑनलाइन मेल पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज पाठवावेत. महाराष्ट्र वनविभागात वन्यजीव बचाव केंद्राकरिता ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी २७००० ते ५०००० रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाटी एम.व्ही पशुवैद्यकीय विज्ञान पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले असावे. याचसोबत उमेदवाराला कामाचा अनुभव असायला हवा.
यासाठी तुमचा बयोडेटा, कागदपत्रे ई- मेल किंवा ऑफलाइन पद्धतीने पाठवावेत.या नोकरीसाठी पात्र उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीत पास झाल्यावर पुढील प्रोसेस केली जाईल. ५ जुलै २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही प्रधान मुख्य वनसंरक्षरक महा कॅम्पा, महाराष्ट्र राज्य, नागपूर, वनभवन, तळ मजला, जी विंग, रामगिरी रोज, सिव्हील गार्डन, नागपूर येथे अर्ज पाठवावेत. तसेच तुम्ही def_nagdiv@yahoo.co.in वर अर्ज पाठवू शकतात.















Discussion about this post