मुंबई । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वामुळेच मिळालं असल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सर्वात मोठे विधान केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री पदाच्या चेहर्याशिवाय निवडणूक लढवणं धोकादायक असल्याचं संजय राऊत यांचं मत आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“नव्या संसदेची आज रीतसर सुरुवात होत आहे. राष्ट्रपतींचे भाषण आज होईल. लोकसभा अल्प काळासाठी सुरू राहील. अल्पमताचे सरकार भाषणातून किती पाठ थोपटून घेत आहे हे पहावं लागेल. यावेळी लोकसभा पूर्ण वेगळी आहे त्याच प्रतिबिंब राज्यसभेत पाहायला मिळेल. कुबड्या घेतलेले पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आपल्याला दिसेल. सूंभ जळला तरी पिळ कायम आहे, तो पीळ आम्ही उतरवू,” असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला.
तसेच “खोट्या नॅरेटिव्हचा पडदा फाडायचा असेल तर मोदी यांच्यापासून सुरू करावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच काय ते बोला आधीच काय काढता. पंतप्रधान मोदींनी पेपर फुटीवर बोलावं, याप्रकरणी ज्यांचा सहभाग आहे, त्या मंत्र्याने राजीनामा द्यायला पाहिजे,” अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
“विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा लागेल. लोकांना चेहरा द्यावाच लागणार आहे. बिनचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पाहिलं आहे, असे म्हणत आगामी विधानसभा निवडणूकांबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.















Discussion about this post