जळगाव । राज्यासह जळगावात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच आता भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना जळगावातून समोर आलीय. अठ्ठावीस वर्षीय विवाहितेवर तिच्या चुलत भावासह त्याच्या दोन मित्रांनी अत्याचार केला. अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून अत्याचार सुरू होता.
पीडिता तीन मुलांची आई आहे. दोन ते अडीच वर्षांपूर्वी लग्न असल्याने नातेवाईक एकत्र आले होते. नात्यातील एकाशी पीडितेची ओळख झाली. त्याने पीडिता अंघोळ करीत असताना, व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला. त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून तिच्याशी शारिरीक संबध प्रस्थापित केले. त्याच्या दोन मित्रांनाही पीडितेवर अत्याचार करून त्रास देणे सुरू केले.
त्रास नकोसा झाल्याने अखेर पीडितेने पती व कुटंबीयाच्या आधाराने हिंमत करून रविवारी (ता. २३) दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडितेचा चुलत भाऊ सचिन किशोर भाट (रा. नंदुरबार), बंटी नेतलेकर (दोंडायचा), नीलेश तमायचेकर (नंदुरबार) यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामवर पीडितेचे अकाउंट असल्याने त्याद्वारे संशयित सचिन भाट पीडितेशी संपर्कात होता. त्याच माध्यमातून त्याने ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.















Discussion about this post