Saturday, May 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बापरे! विवाहितेला गुंगवून विहिरीत फेकले; सुदैवाने विवाहिता जिवंत..शिरसोलीतील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 25, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
बापरे! विवाहितेला गुंगवून विहिरीत फेकले; सुदैवाने विवाहिता जिवंत..शिरसोलीतील घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव। जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एका विहिरीत जिवंत महिला आढळून आली. मुलीला घेण्यासाठी शाळेत गेली असता तिला अज्ञात महिलेने गुंगवून शिरसोली येथे नेत विहिरीत फेकून दिले. सुदैवाने विवाहिता जिवंत असून तिने संपूर्ण रात्र विहिरीत काढली. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू असून पोलीस कर्मचारी कसून चौकशी करत आहे.

दीपिका दीपक पाटील (वय २६, रा. नेहरूनगर, जळगाव) असे सदर महिलेचे नाव आहे. दिपीका ह्या नेहरूनगर येथे पती, मुलांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २४ जून रोजी दुपारी एक वाजेनंतर त्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना रस्त्यावर एक अनोळखी महिला भेटली. त्या महिलेने विवाहितेच्या डोक्यावरून हात फिरवला व तिची शुद्ध हरपली. त्यानंतर तास-दीड तासाने विवाहितेला गुंगीत असताना जाणवले की, आपण पाण्यात असून एका विहिरीत असल्याचे समजले. मात्र गुंगी असल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती.

सोमवारची पूर्ण रात्र विवाहितेने विहिरीत काढली. दुसरीकडे शाळेत मुलीचे पालक तिला घेण्यासाठी आले नाही म्हणून शिक्षकांनी मुलीच्या वडिलांना फोन केला. तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितले की, तिची आई तिला शाळेत घ्यायला गेली आहे. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी काकूला पत्नीला पाहण्यासाठी व मुलीला घेण्यासाठी पाठवले. दिवसभर व रात्रभर सदर महिलेचा परिवार शोध घेत होते. दरम्यान शिरसोली येथे मुख्तार मुनाफ कुरेशी हे त्यांच्या आकाशवाणी जवळील शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांना सदरहू महिला ही विहिरीत बसलेली दिसून आली.

त्यांनी तात्काळ पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला दोरखंडाच्या मदतीने बाहेर काढले. गावातीलच एका तरुणाने तिला ओळखले. त्याच्या मित्राची ती पत्नी असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला कळवले. त्यानंतर सदर महिलेला शासकीय वैद्यकीय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिच्या नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमागचा उद्देश काय याचा एमआयडीसी पोलीस स्टेशन शोध घेत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

Jalgaon : भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढले अन्..

Next Post

दिलासा नाहीच! अरविंद केजरीवालांना हायकोर्टाचा मोठा धक्का, जामीनाला स्थगिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दिलासा नाहीच! अरविंद केजरीवालांना हायकोर्टाचा मोठा धक्का, जामीनाला स्थगिती

दिलासा नाहीच! अरविंद केजरीवालांना हायकोर्टाचा मोठा धक्का, जामीनाला स्थगिती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी संधी! रेल्वेत १६४४ पदांची भरती, परीक्षेविना होणार थेट निवड

May 9, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव एसपी बंगल्यावरील सुरक्षेत हलगर्जीपणा; दोन अंमलदार निलंबित, पोलीस विभागात खळबळ

May 9, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; ५ लाखांची लाच घेताना शाखा अभियंता जेरबंद

May 9, 2026
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

चोपड्याचे निवृत्त प्राध्यापक सायबर भामट्यांच्या जाळ्यात; ‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली तब्बल १५.५० लाख लुटले!

May 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page