भंडारा । भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोटीचे तीन तुकडे झाले. परंतु बचाव पथक वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याच वेळी हा अपघात घडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सावंत यांच्या स्वागताचे भंडारा जिल्ह्यात जागोजागी होर्डिंग लावण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाने रोजगारात वाढ होणार आहे.
काय आहे प्रकल्प
वैनगंगा नदीच्या पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर हा जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्पा साकारला जात आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच या प्रकल्पाची उभारणी होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 10 हजाराहून अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे. या प्रकल्पासाठी 102 कोटींचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.















Discussion about this post