पुणे : राज्यात सध्या पुण्याचं हिट अँड रन प्रकरण चांगलंच गाजत असून यावरून राजकारणही पेटलं आहे. विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जातं आहे. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुण्याचं हिट अँड रन प्रकरण झाल्यानंतर अजित पवार यांनी पुणे पोलिसांना फोन केला होता. त्यांनी फोन केला होता की नाही याचा खुलासा करावा. त्यांची नार्को टेस्ट करून राजीनामा घ्या, अशी मागणी दमानिया यांनी केली होती.
दमानिया यांचं नार्को टेस्टचं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं आहे. मी नार्को टेस्टला तयार आहे. माझी नार्को टेस्ट क्लिअर आली तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडियासमोर यायचं नाही. त्यांनी घरात बसायचं. संन्यास घ्यायचा. आहे का तयारी?, असं आव्हानच अजित पवार यांनी दिलं आहे. मीडियाशी संवाद साधताना अजितदादांनी हे आव्हान दिलं आहे.
पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी कोणताही हस्तक्षेप न करता प्रकरण हाताळण्याचं पोलिसांना सांगितलं आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि योग्य तपास करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणात ज्या मुलाने अपघात घडवला. तो आतमध्ये आहे. त्याचा बाप आतमध्ये आहे. त्याच्या बापाचा बापही आतमध्ये आहे. कायद्याने आणि नियमाने जी चौकशी व्हायला हवी होती ती सुरू आहे. या प्रकरणात कोणी दोषी असतील… मग त्यात अजित पवार जरी दोषी असला तरी त्याच्यावर कारवाई होईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं















Discussion about this post