भुसावळ : भुसावळ शहरात काल बुधवारी रात्री ९:४५ वा. घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे दोघे ठार झाले. मात्र पोलिसांनी ते गंभीर जखमी असून त्यांना उपचारार्थ जळगावला हलविले असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. जळगाव नाक्यावर मरीमाता मंदिराजवळ अज्ञातांनी हा गोळीबार केला.
संतोष बारसे हे माजी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे यांचे पती आहेत. ते राखुंडे यांच्यासोबत कार क्रमांक एम.एच.१९– पी.जी. ०१८७ ने भुसावळकडे येत होते. त्याचवेळी अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. चालकाच्या बाजूने दोघांवर गोळीबार झाला आहे. यानंतर शहरात पळापळ सुरू झाली. ही घटना कळताच शहर पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
हल्ला झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी तातडीने डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात नेले. मात्र या हल्ल्यात संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोन्ही जण ठार झाल्याच्या वृत्ताला डॉ. मानवतकर यांनी दुजोरा दिला आहे पण पोलिसांनी ते गंभीर जखमी असल्याचे म्हटले आहे.















Discussion about this post