मुंबई । देशात तापमान वाढीचा कहर पाहायला मिळत असून अशातच नागरिक आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आलीय. मान्सून येत्या ५ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय. या काळात केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात असलेल्या भारतीय हवामान विभागाच्या केंद्रानुसार, केरळमध्ये येत्या ५ दिवसांत मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव आणि कोमोरिन प्रदेशातील उर्वरित भागांमध्ये पुढे जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत लक्षद्वीप प्रदेश, केरळचा काही भाग, दक्षिण-पश्चिम आणि मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, उत्तर-पूर्व बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
याआधी मान्सूनबाबत अंदाज व्यक्त करताना IMD ने अंदमान निकोबारमध्ये मान्सून पोहोचल्याचे सांगितले होते. 31 मे किंवा 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो.















Discussion about this post