मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के निकाल लागला आहे. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी लागला आहे. मंडळाच्या ९ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च दरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
यंदा राज्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तर्णी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल १.९८ टक्क्यांनी वाढला.
राज्यात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचे ९१.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला. नागपूरप विभागातील ९४.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाच्या ९ विभागीय मंडळाकडून १ ते २६ मार्च दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली.















Discussion about this post