जळगाव । जळगाव जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. विमान कंपनी ‘फ्लाय ९१ ने जळगावहून पुण्यासाठी २४ व २६ मे या दोन दिवशी ट्रायल फ्लाइटची घोषणा केली होती. ट्रायल सेवेच्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला, रविवारी दुसऱ्या दिवशीची फ्लाइट उड्डाण भरण्यापूर्वीच ही सुविधा मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व रविवार अशी आठवड्यातून चार दिवस देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले.
यासाठी विमान कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळावर तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे. विमान कंपनीतर्फे गोवा व हैदराबाद या दोन शहरांना यापूर्वीच विमान सेवा दिली जात असून, गोव्याच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आठवड्यातून तीन ऐवजी सहा दिवस सेवा दिली जाते.
विमानाची वेळ अशी
जळगाव-पुणे विमान दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पुण्यासाठी उड्डाण भरून ३ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. तेथे अर्धा तासाचा हॉल्ट घेऊन दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी जळगावकडे परतेल. ते जळगावात ५ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल
१९९१ रुपयांत प्रवास
जळगाव-पुणे १९९९ रुपये एवढे भाडे रिजनल कनेक्टिव्हीटी सर्व्हिस सुविधेंतर्गत असणार आहे. ही सुविधा प्रत्येक फ्लाइटमध्ये पहिल्या ३५ तिकिटांसाठी दिली जाणार असल्याचे बुकिंग एजंट आशिष पाटील यांनी नमूद केले आहे.















Discussion about this post