बुलढाणा । दरवर्षी राज्यातील शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात. कारण यातून पावसाळा, पीक पाण्याबाबत अंदाज वर्तविला जातो. अक्षय तृतीयेला सायंकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे निरीक्षण करून भाकीत वर्तवण्यात येते. दरम्यान, आज शनिवारी सकाळी ६ वाजेला भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यात शेतकऱ्यांना दिलासादायक भाकीत आहे.
पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे.
भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यावर्षी पाऊसपाणी चांगेल होणार असून पीक परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे. मात्र, पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यात पावसाळा कमी राहील, तर नंतरच्या दोन महिन्यात भरपूर पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना फटका देण्याची शक्यता आहे. जून, जुलै हे महिने कमी पावसाचे असणार आहेत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.















Discussion about this post