नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एविएशन (नागरी उड्यान मंत्रालय) यांच्या अंतर्गत भरती निघाली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.
ही भरती नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) साठी सुरू आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.
या भरती प्रक्रियेतून तब्बल 108 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. यामुळे वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.
या पदांसाठी होणार भरती
या भरती प्रक्रियेतून नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये सहसंचालक, उपसंचालक, प्रादेशिक संचालक, वरिष्ठ नागरी विमान वाहतूक अधिकारी अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
BCAS भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचा बायोडाटा हा जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. यासोबतच काही कागदपत्रेही जोडावी लागतील. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्या साईटवर देखील आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहेत. ही तर एक मोठी संधी असून नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये तुम्ही नोकरी करू शकता.















Discussion about this post