भुसावळ । नांदुरा ते जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणेत नॉन इंटरलॉकिंक कामासाठी उद्या म्हणजेच सोमवारी (दि.६) प्रशासनाने ट्रैफिक ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ ते अकोला मार्गावर अप आणि डाऊन लाइनवरील ६ मेल, एक्स्प्रेस गाड्या
विविध स्थानकांवर जातील, तर बडनेरा थांबवल्या नाशिक, भुसावळ वर्धा मेमू या चार गाड्या रद्द केल्या आहेत. हा ब्लॉक दुपारी २.२० ते ४.५० वाजेपर्यंत राहील. या काळात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या सहा प्रवासी गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबल्या जातील. त्यात डाऊन मार्गावरील ०७९१६ जयपूर हैद्राबाद विशेष गाडी २.४५ तास, २०८०४ अजमेर ते पुरी एक्स्प्रेस २ तास, ०११४० मडगाव ते नागपूर विशेष गाडी १.४५ तास थांबवली जाईल, अप मार्गावरील ११०४० गोंदिया ते कोल्हापूर एक्स्प्रेस १ तास, ०९३६६ बडनेरा ते भुसावळ मेमू १.१० तास आणि १२४८५ नांदेड ते श्रीगंगानगर एक्स्प्रेस ३५ मिनिटे थांबवली जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे
या गाड्या केल्या रद्द ब्लॉकमुळे ६ मे रोजी चार रेल्वे गाड्या रद केलेल्या आहे. त्यात १११२१ वर्धा ते भुसावळ, १११२२ भुसावळ ते वर्धा, ०५२१२ नासिक ते बडनेरा आणि ०५२११ बडनेरा ते नासिक मेमू या चार गाड्या धावणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होईल.















Discussion about this post