Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पँथर नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे निधन ; आज अंत्यविधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 5, 2024
in महाराष्ट्र
0
पँथर नेते माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे निधन ; आज अंत्यविधी
बातमी शेअर करा..!

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकर चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री मा. गंगाधर सुखदेव गाडे (७६) यांचे शनिवारी सकाळी ४.३० वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक ५ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यददर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच दुपारी ४ वाजता अंत्यविधी केला जाणार आहे.

गाडे यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच शहरातील अनेक नेते, कार्यकर्ते यांची त्यांच्या निवासस्थानकडे धाव घेतली होती. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनीही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी सौ सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे.

गंगाधर गाडे यांचा अल्प परिचय
गंगाधर गाडे यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९४७ रोजी कवठाळ तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे झाला होता. दहावीनंतर ते १९६५ ला मिलिंद महाविद्यालयात आले होते. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना नेतृत्वाची आवड होती. विद्यार्थी चळवळीतील आंदोलनानंतर १९७२-७३ मध्ये त्यांनी दलित पँथर मध्ये राजा ढाले यांचे नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. शहरातील बहुतेक मागासवर्गीय वसाहती त्यांनी वसविल्या होत्या. आंबेडकरी चळवळीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होता. आणीबाणीच्या काळात त्यांना आठ महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी भारतीय दलित पँथरच्या स्थापनेत पुढाकार घेतला. १९९९ मध्ये त्यांना परिवहन राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती त्या काळात त्यांनी एसटी साठी उल्लेखनीय कार्य केले. सध्या ते पँथरस रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना करून शैक्षणिक कार्य केले आहे. सध्या त्यांच्या पत्नी सूर्यकांता गाडे मुलगा सिद्धांत गाडे आणि सून भावना गाडे या शिक्षण संस्थेची धुरा सांभाळत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय नौदलाची अग्निवीरांसाठी जम्बो भरती जाहीर ; १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

Next Post

बडनेरा-नाशिक, भुसावळ-वर्धा मेमू उद्या रद्द ; कारण जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार

बडनेरा-नाशिक, भुसावळ-वर्धा मेमू उद्या रद्द ; कारण जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page