मुक्ताईनगर | लोकसभा निवडणूक तोंडावर आली असता एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपात पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंत्तू त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता रोहिणी खडसे यांनी पक्षात थांबण्याबाबत शरद पवार यांना साकडं घातलं आहे. मला आपल्या पक्षातच राहायचे आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे आपण मला सांभाळून घ्यावे. सुप्रियाताई यांना आपण जे प्रेम देता तसे प्रेम मला द्यावे असं प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित प्रचार सभेत केले.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे
एकनाथराव खडसे यांचा पक्षांतराचा जो निर्णय झाला त्या निर्णयानंतर मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर मी शरद पवार यांना भेटले व सांगितले. मला आपल्या राष्ट्रवादी पक्षात थांबायचे आहे. पण आपला आदेश, आपली सूचना आणि आपण सांगत असाल तर माझी आपल्या पक्षात थांबायची इच्छा आहे. कारण मला आपल्या पक्षाची विचारधारा आणि आपले नेतृत्व आवडते आमच्या वाईट काळात आपण जी साथ आम्हाला दिली.कारण मला आपल्या पक्षाची विचारधारा आणि आपले नेतृत्व आवडते आमच्या वाईट काळात आपण जी साथ आम्हाला दिली. ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. म्हणून मला आपल्या पक्षातच राहायचे आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे आपण मला सांभाळून घ्यावे. सुप्रियाताई यांना आपण जे प्रेम देता तसे प्रेम मला द्यावे, व मला कन्येप्रमाणे सांभाळून घ्यावे अशी शरद पवार यांना विनंती
शरद पवार यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. प्रांताध्यक्ष जयंत पाटिल , सुप्रियाताई सुळे आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करते. पक्षाने आणि सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठेने काम करणार आणि भविष्यात देखील याच पक्षात राहून काम करत राहिल. नेतेगणांनी मला एकटे पडू दिले नाही आणि प्रत्येक वेळेस मला साथ देत आहेत. त्याबद्दल नेते गणांना धन्यवाद देते असे रोहिणी खडसे यावेळी म्हणाल्या. पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या साठी माझ्या प्रत्येक बुथ वरचा कार्यकर्ता हा जोमाने काम करत असुन प्रत्येक बुथ वर श्रीराम पाटील यांना मताधिक्य मिळवून देईल.















Discussion about this post