मुंबई । मार्च नंतर एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतीने उच्चांकी गाठल्याने लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागली. सध्या मे तसेच जून महिन्यात देखील लग्नाचे मोजकेच मुहूर्त आहेत. यातच लग्नाच्या तयारीत असलेल्या नागरिकांना सोने खरेदीसाठी दिलासा मिळणार आहे. शनिवारी देखील सोन्याचे दर घसरलेत.
आज सोन्याच्या दरात १० रुपयांचा फरक आहे. १० रुपयांनी प्रति तोळा सोन्याची किंमत घसरली आहे. त्यामुळे आज प्रति तोळा २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५,८९० रुपये इतका आहे. काल हेच सोनं ६५,९०० रुपये प्रति तोळा विकलं गेलं. आज १०० ग्राम सोन्याची किंमत १०० रुपयांनी कमी झाली असून याची किंमत ६,५८,९०० रुपये इतकी आहे.
२४ कॅरेट सोन्याचा हिशोब समजून घेऊ
२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत देखील प्रति तोळा १० रुपयांची घट दिसत आहे. आज प्रति तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,८७० रुपये इतकी आहे. तक १०० ग्राम सोन्यात १०० रुपयांची घट होऊन ७,१८,७०० रुपये वर भाव पोहचलेत. तसेच १८ कॅरेट सोनं प्रति तोळा ५३,९१० रुपयांनी विकलं जात आहे.
मुंबई आणि पुण्यातील सोन्याचा भाव
मुंबईमध्ये आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ६५,७४० रुपये इतकी आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७२० रुपये इतकी आहे. तसेच मुंबईत १८ कॅरेट सोन्याचे दर ५३,७९० इतके आहेत.
पुण्यामध्ये २२ कॅरेट सोनं ६५,७४० रुपये प्रति तोळा, २४ कॅरेट सोनं ७२,७२० रुपये प्रति तोळा तर ५३,७९० रुपये प्रति तोळा असे दर आहेत. पुण्यातही सोन्याचे दर उतरले आहेत.
चेन्नईमध्ये २२ कॅरेट ६६,१४० रुपये, तर २४ कॅरेट ७२,१५० रुपये प्रति तोळा किंमत आहे.
नवी दिल्लीमध्ये २२ कॅरेट ६५,८९० रुपये, तर २४ कॅरेट ७१,८७० रुपये प्रति तोळा किंमत आहे.
कोलकत्तामध्ये २२ कॅरेट ६५,७५० रुपये, तर २४ कॅरेट ७१,७२० रुपये प्रति तोळा किंमत आहे.
चांदीचे दरही कोसळले
चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज घसरण झाली आहे. १ किलो मागे १०० रुपयांचा फरक आहे. काल एक किलो चांदी ८३,५०० रुपयांना मिळत होती. आज एक किलो चांदीची किंमत ८३,४०० रुपये इतकी आहे.















Discussion about this post