नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी असून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनकडून भरती प्रक्रिया राबविली जात आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया एकून 28 पदांसाठी सुरू आहे.
या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला ongcindia.com या साईटवर मिळेल आणि याच साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे.
भरली जाणारी पदे :
या भरती प्रक्रियेतून ONGC कनिष्ठ आणि सहयोगी सल्लागारांची पदे ही भरली जाणार आहेत.
आवश्यक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी
वयाची अट :
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून 63 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना मुलाखत देखील द्यावी लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मेल करून मुलाखतीच्या तारीख आणि इतर माहिती ही दिली जाईल. त्यानंतरच पुढील प्रक्रिया ही केली जाणार आहे. ही एकप्रकारची मोठी संधीच आहे.
Notification : PDF
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. ongcindia.com या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेकडूनही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारांनी त्याही भरतीची अधिसूचना वाचून घ्यावी.















Discussion about this post