मुंबई । भाजपचे प्रधेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी औकात काढत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. खरंतर राहुल गांधी यांनी सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. यांच्या वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे चांगलाच समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे की, सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं.
निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है
लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला, असंही ते म्हणाले















Discussion about this post