राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील एका गावात भारतीय हवाई दलाचे UAV विमान कोसळल्याची घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने विमान कोसळल्यामुळे लागलेली आग आटोक्यात आणली आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनासह हवाई दलाचे अधिकारी जिल्हा मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या ढानी जजिया गावात पोहोचले होते. विमान नियमितपणे उड्डाण करत होते. जैसलमेरच्या पिठाळा भागात हा अपघात झाला आहे.
हे विमान सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते, असं सांगितलं जात आहे. पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितलं की, ते हेरगिरी करणारं विमान असू शकते. विमान क्रॅश झाल्यानंतर त्यात मोठी आग लागली होती. त्यामुळे ते जळून राख झाले आहे. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता.
हवाई सेवेच्या या विमानात पायलट नसतात. ते रिमोट कंट्रोलने चालवले जाते. या विमानाचा वापर सीमा भागातील हेरगिरीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. जैसलमेरच्या पिठाळा गावाजवळ हे विमान मोठा स्फोट होऊन खाली कोसळले.
स्फोटाचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक विमान अपघातस्थळी पोहोचले आहेत. विमान अपघातानंतर कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी न्यायालयीन चौकशी स्थापन करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती जनसत्ताच्या हवाल्यानुसार मिळत आहे.















Discussion about this post