जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर त्यांच्या उपस्थिती रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लोकांना आता मोदी नको, हुकूमशाही नको, तर लोकशाही पाहिजे. मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.
आज देशाचे चित्र बदललेले आहे. जो देश धान्य आयात करत होता आता तोच देश निर्यात करत आहे. हे शेतकऱ्यांनी केले आहे. जगभर साखर पुरवली जात आहे. आज मोदी यांचे राज्य आहे. बळीराजाला मदत होईल असे काही नाही. मी कृषी मंत्री झालो तेव्हा केवळ एक महिन्याचे धान्य शिल्लक होते. मी अस्वस्थ झालो. आमच्या लोकांना खायला नाही. शेतकऱ्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे. मागील काळात आपण शेतीसाठी दिंडी काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. देशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो? म्हणून मी अस्वस्थ झालो होतो. मागील काळात 61 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते.
काँग्रेसचा विचार ग्रामीण भागात फैजपूर अधिवेशनापासून दिला गेला. अनेक नेते होऊन गेले, त्यांनी राज्याचा आणि देशाचा विचार केला. आता मोदींचे काळात काय आहे? अनेक लोकांना नोकरी नाही. आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. केळीचे पीक नष्ट झाले, मात्र शासकीय यंत्रणेचा उपयोग हुकूमशाहीसारखा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जात आहे याचा अर्थ ही हुकूमशाही आहे असंही शरद पवार म्हणाले
जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांनी देशासाठी खस्ता खायल्या आहेत त्यांच्यावर टीका करणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? आपण देशाचे पंतप्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ते भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. आज देशात वेगळा विचार करण्याची गरज आहेत















Discussion about this post