सोलापूर । एकीकडे राज्यातील अनेक भागात उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवत असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जवळपास दीड तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पाणी आले.
नाल्याला अचानक पाणी आल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव -गरोळगी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, भोसे, शेलपिंपळगाव, काळुस, बहुळ आणि दावडी परिसरात अवकाळी पावसामुळे काही ठिकाणा फटका बसला आहे तर काही ठिकाणच्या पिकांना याचा फायदा होणा आहे. दक्षिण रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या, तर दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढलं आहे.धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा,नळदुर्ग,तुळजापूर,धाराशिव व कळंब,परंडा परिसरात पावराची जोरदार बॅटींग सुरू आहे.
या फळबागांना मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात आज झालेल्या गारपिटीने निलंगा, औसा, रेनापूर, लातूर या भागातील आंबा फळबागांना मोठा फटका आहे.















Discussion about this post