जळगाव । जळगाव एमआयडीसी सेक्टर ‘डी ‘ मध्ये केमिकल कंपनी आज बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती कि आगीचे दूरदूरवर धुक्याचे लोळ दिसत होते. दरम्यान, या आगीत कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात असून आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणेकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच या घटनेत जखमींना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबत असे की, जळगाव एमआयडीसी सेक्टर ‘डी ‘मधील केमिकल कंपनीला आज सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास हे आग लागली आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून मात्र या आगीमुळे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती आहे. जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशामक बांबाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. जखमी असलेल्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी तीन रुग्णवाहिका असून रुग्णालयांनाही सूचना दिल्या आहेत















Discussion about this post