अमळनेर । येथील तांबेपुरा येथील रहिवासी शीतल पुंडलिक पवार हिने गरिबीच्या परिस्थितीवर मात करत कोणत्याच स्पर्धा परीक्षेची शिकवणी न लावता अपार मेहनत घेत पोलिस उपनिरीक्षक बनली असून, एसटी कैटेगरी मधून ती चौथी आली आहे. शीतल लहान असताना तिच्या वडिलांनी तिला व तिच्या आईला सोडल्याने दोघी उघड्यावर आल्या होत्या. मात्र इंदूबाईने धाडस ठेवून चिमुकल्या शीतलला घेऊन उघड्या वाळूच्या ढिगाऱ्याचा आसरा घेतला. सोबत कोणी नव्हते मात्र लेकीला सोबत घेऊन तिने अनेक दिवस तसेच काढले अंगाशी बांधून ती गडखांब, दहिक्द, पातोंडा, नगाव शिवारात गवताचा चारा कापायला जायची.
आणि तो चारा विकून दिवस भागवायची. हळूहळू शीतल मोठी होत गेली. आईच्या कष्टाचे मेहनतीचे संस्कार तिच्यावर पडत गेले. आपली मुलगी शिकली पाहिजे याची जिद्द बाळगत इंदूबाईने शीतलला शिकवले. शीतल देखील आईच्या घामाची जाणीव करत आहे त्या परिस्थितीत शिक्षण घेऊन एम. कॉम झाली. आईचचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घराची जबाबदारी शीतलने सांभाळली आणि सेतू केंद्र तसेच खासगी बँकेत काम करून शीतलने घर खर्च तर भागवला मात्र अभ्यासही केला.
मनात बाळगली आणि तिने पुस्तके आणून स्वतःच अभ्यास सुरू के सुरू केला. ना कोणाचे मार्गदर्शन ना कोणाची शिकवण घेत स्वतःच्या मेहनतीने २०२१ ची पोलिस उपनिरीक्षक पदाची स्पर्धा परीक्षा शीतलने उत्तीर्ण केली. यापूर्वी डीवायएसपी व्हायची इच्छा असून, पहिली परीक्षा पास तिने मंत्रालयातील अधिकारीची परीक्षा पास केली आहे. विशेष म्हणजे आधीच्या काळात तिच्याकडे मोबाइल देखील नव्हता. ती एवढ्यावर थांबली नसून तिची डीवायएसपी व्हायची इच्छा असून पहिली परीक्षा पास झाली आहे. दुसरीची तयारी सुरू आहे















Discussion about this post