मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी पक्षप्रवेश करण्यामागील कारणही सांगितलं.
“मी दिवाळी पाडव्याला इच्छा व्यक्त केली की, खासदारकीसाठी मी इच्छुक आहे म्हणून. मी सगळ्या मतदारसंघात फिरत राहिलो. भाजपची 13 मार्चला उमेदवारी जाहीर झाली. मी म्हटलं आता घरी बसू. पुढच्यावेळेस संधी मिळेल तेव्हा बघू. पण माळशिरस तालुक्याची जनता तसेच माढा लोकसभेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने मोठ्या दादांना आणि बाळादादांना भेटायला सुरु केलं. भैय्याला आमच्या गावात पाठवून द्या. भेटायचं आहे.
मग बाळादादांनी सांगितलं की, प्रत्येक गावात जा आणि लोकं काय म्हणतात ते ऐकून घ्या. मी प्रत्येक गावात गेलो. आमच्या आजोबापांसून रणजित दादा यांनी आपापली पदे असताना काय-काय दिलं याची उजळणी गावकरी करुन देत होते. पण सर्वांनी आठवण करुन दिली. एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं, उभं राहणार असाल तर या, नाहीतर गाडीत बसा आणि जा. जाईल तिथे असाच पट्टा सुरु झाला”, असा अनुभव धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितला.















Discussion about this post