Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ठाकरे गटात ‘इनकमींग’ ; पाचोरा-भडगावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधले शिवबंधन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 14, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
ठाकरे गटात ‘इनकमींग’ ; पाचोरा-भडगावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधले शिवबंधन
बातमी शेअर करा..!

मुंबई : जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे.

जळगाव जिल्हा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडच्या काळात अनेक मान्यवर दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच जळगावचे खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आपल्या समर्थकांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. यानंतर लागलीच करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देखील मिळाली होती. यानंतर, लवकरच शिवसेना-उबाठा पक्षात मान्यवरांचे आगमन होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

आजच्या सोहळ्यात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील, भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर, जळगावच्या माजी नगरसेविका सरिता नेरकर, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील नेते मोरसिंग राठोड यांच्यासह इतरांनी पक्षात प्रवेश घेतला.

प्रवेश सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात पाचोरा-भडगाव मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी पक्षात दाखल झाले. यात शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिताताई पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष तथा लासुरे येथील रहिवासी अजय रंगराव देवरे; पंचायत समितीचे माजी सभापती तथा पिंपळगाव हरेश्‍वर येथील रहिवासी देविदास रामदास महाजन; लासुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कपिल शिवाजी देवरे, लासुरे येथीलच सामाजिक कार्यकर्ते पंकज सुभाष देवरे, पाचोर्‍याचे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ता शेख रसूल शेख उस्मान; पाचोरा येथील अल्पसंख्यांक कार्यकर्ता फिरोज पिंजारी; भडगाव येथील बशीर करीम शेख; कामरान बशीर शेख; इलियास अब्बास अली; शाहबाज इफ्तीखार सय्यद, अहमद शमीउद्दीन शेख; भडगाव येथील सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक बशीर शेख, भडगाव येथीलच राजू शेख; अभियंता मोहन परदेशी, वकील संघाचे सदस्य मोहसीन शेख; सामाजिक कार्यकर्ता साबीर शेख; शफीक टेलर, उषाताई परदेशी, गायत्रीताई पाटील, शब्बीर खान, शेख इब्राहिम, शेख अख्तर मुल्ला; शेख सलीम, अजमल खान, शेख खालीक; जुवार्डी येथील माजी सरपंच नाना रामदास पाटील, जुवार्डी विकासो चेअरमन प्रकाश रामराव पाटील, शिवाजी लक्ष्मण पाटील, आबा केशव पाटील व संजय शिवराम पाटील या मान्यवरांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेषदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून या नेत्यांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात पक्षाला मोठ्या प्रमाणात बळकटी मिळून लोकसभा निवडणुकीत याचे प्रतिबिंब उमटणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपल्या मनोगतातून पाचोरा-भडगाव मतदारसंघात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांना डॉ. अस्मिताताई पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांमुळे मजबुती मिळणार असल्याचे प्रतिपादन केले. तर, वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून विविध मान्यवरांचे पक्षातील आगमन हे स्वागतार्ह असून हा विरोधकांना सुरूंग लागला असून याचे आगामी काळात नक्कीच पडसाद उमटणार असल्याचे प्रतिपादन केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळे हादरले ! कौटुंबिक वादातून पत्नीची भरदिवसा गळा चिरून हत्या

Next Post

निवडणूकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का ; बडा नेता शरद पवार गटात करणार प्रवेश?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजित पवारांना धक्का ; या नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला

निवडणूकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा धक्का ; बडा नेता शरद पवार गटात करणार प्रवेश?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page