रावेर । रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात गेल्या २७ दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेचे गुऱ्हाळ आज मंगळवारी थांबणार आहे. पुणे येथे सोमवारी इच्छुकांसह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेनंतर आज मंगळवारी शरद पवार गटातर्फे रावेरातील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. यात श्रीराम पाटील यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे दावेदार असणारे उद्योजक श्रीराम पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचे रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकिट पक्के मानले जात आहे.
दरम्यान, स्वत: शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत श्रीराम पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी प्रा. गोपाल दर्जी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.















Discussion about this post