जळगाव | विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे १० ते १४ एप्रिल असे पाच दिवसीय भीम विचारोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गुरुवारी जयंती उत्सव समितीतर्फे देण्यात आली.
कार्यक्रमात १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता, डॉ. आंबेडकर पुतळा (रेल्वे स्टेशन) येथे काव्य प्रबोधन, १९ रोजी दुपारी ४ वाजता काव्यरत्नावली चौकापासून आरती म्हस्के यांच्या नेतृत्वात महिलांची दुचाकी रॅली, सायंकाळी ७ वाजता फुले मार्केट येथे व्याख्यान, १२ रोजी सकाळी १० वाजता, सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, १३ रोजी सकाळी ८ वाजता, डॉ. आंबेडकर उद्यान, गणेश कॉलनी येथे चित्रकला स्पर्धा, म्युझिक शो, १४ रोजी सकाळी ७.३० वाजता, डॉ. बाबासाहेब पुतळा रेल्वे स्टेशन येथे अभिवादन सभा व सायंकाळी ७ वाजता, मनपा गेटसमोर मिरवणूक स्वागत समारोह होईल, असे उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप शिरसाठ, कार्याध्यक्ष विजय सुरवाडे, सचिव आशिष सपकाळे, मुकुंद सपकाळे यांच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे.















Discussion about this post