मुंबई /जळगाव । राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा कायम आहे. यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यातही रावेरच्या उमेदवाराचे नाव नव्हते. आता आज शुक्रवारी हे नाव जाहीर होईल, अशी शक्यता पक्षातील स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
भिवंडी आणि बीड या दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र रावेरच्या उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीय. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे.
१३ मार्च रोजीच त्यांचे उमेदवार जाहीर झाले. त्यामुळे त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटानेही भाजपचे कार्यकर्ते गळाला लावून उमेदवारी जाहीर केली. शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र, रावेरचा उमेदवार अजून का जाहीर करीत नाही, असा प्रश्न आहे.















Discussion about this post