सातारा । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आली असून साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. आठवले यांच्या कारला साताऱ्यातील खंबाटकी घाटामध्ये अपघात झाला. समोर वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे आठवले यांची कार पुढच्या गाडीवर धडकली.
या अपघातात सुदैवाने रामदास आठवले आणि कुटुंब सुखरुप आहेत. रामदास आठवले यांच्या पत्नीला किरकोळ इजा झाली आहे. या अपघातानंतर खंबाटकी घाटामध्ये ट्रॅफिक जाम झाली आहे.















Discussion about this post