Tuesday, March 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक ; प्राचार्य के. सी. पालीवाल यांचे प्रतिपादन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 19, 2024
in जळगाव जिल्हा
0
संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक ; प्राचार्य के. सी. पालीवाल यांचे प्रतिपादन
बातमी शेअर करा..!

चोपडा – कोणत्याही समाजाची प्रगती ही त्यांच्या समाजातील आचार, विचार व संस्कारासह त्यांच्या समाज संघटन शक्तिबलावर अवलंबून असते. यामुळेच संघटन शक्ती हेच समाज प्रगतीचे द्योतक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ प्राचार्य के. सी. पालीवाल यांनी चोपडा पालीवाल पंचायततर्फे आयोजित नारी शक्ती सन्मानप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना केले.

शहरातील आनंदराज पॅलेसमध्ये आयोजित या कार्यक्रमात बारा ज्येष्ठ मातृशक्तीचा सन्मानपत्र, साडी आहेर, तुळशीमाळ, गीतासार प्रदान करून सौ. शशिकला पालीवाल व स्थानिक महिला मंडळ सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यात उमाबाई पालीवाल, कमलाबाई पालीवाल, जसोदाबाई पालीवाल, विजयाताई पालीवाल, सुनीता पालीवाल, कमलबाई पालीवाल, प्रमिलाबाई पालीवाल, कोकिळा मगनलाल पालीवाल, प्रेमाबाई पालीवाल, भिकुबाई पालीवाल यांना सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांचा सत्कार
याप्रसंगी गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये कथक नृत्यात समाविष्ट पालीवाल समाजातील कु. सौम्या विजय पालीवाल, कु.भाव्या हेमंत पालीवाल (मंदसौर), कु. अनन्या पालीवाल, कु. मोक्षदा कानुनगो, कु. सानवी मंडलोई (सेंधवा) यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.भालचंद्र चुनिलाल पालीवाल यांना जीवनगौरव पुरस्काराने चोपडा पालीवाल समाजातर्फे सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश कानूनगो यांनी आपल्या मनोगतात चोपडा पालीवाल समाजाची वाटचाल दैदिप्यमान पणे सुरू असून भविष्यातही समाजाचा नावलौकिक अधिकाधिक वाढत राहो, अश्या शब्दांत शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचा शुभारंभ मां आशापूर्णा प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष प्रदीप पालीवाल, सचिव डॉ. विशाल पालीवाल, उपाध्यक्ष गिरीश पालीवाल, नागेंद्र पालीवाल, कोशाध्यक्ष राजेंद्र पालीवाल यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे महामंत्री अनिलकुमार पालीवाल आणि सौ. रुपाली विशाल पालीवाल यांनी केले. याप्रसंगी सोयत महिला मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजश्री पालीवाल यांचे स्वागत सौ. किरण पालीवाल यांनी केले. कार्यक्रमात फाग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ. निर्मल टाटीया यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगरसेवक चंदुलाल पालीवाल, सुरेश पालीवाल, हरिओम पालीवाल खंडवा, विकास पालीवाल, ओमप्रकाश पालीवाल, दिलीप पालीवाल, दीपक पालीवाल लासूर, जितेंद्र पालीवाल चौगाव, दमयंती पालीवाल, आदी शेकडो समाजबांधव, महिला मंडळ व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री महेश पालीवाल, अशोक पालीवाल, संदीप पालीवाल, सौ. रुपाली पालीवाल, सौ.किरण पालीवाल, सौ. सीमा पालीवाल, आदींनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकनाथ खडसेंच्या माघारीनंतर रावेरमध्ये शरद पवारांचा नवा डाव ; काय आहे वाचा

Next Post

लोकसभेच्या तोंडावर भाजपला धक्का ; मोदींच्या मंत्रिमंडळातून एका मंत्र्याचा राजीनामा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लोकसभेपूर्वी भाजपला तगडा झटका ; या राज्यात मित्रपक्षाने सोडली साथ

लोकसभेच्या तोंडावर भाजपला धक्का ; मोदींच्या मंत्रिमंडळातून एका मंत्र्याचा राजीनामा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page