अजमेर : राजस्थानच्या अजमेरमध्ये साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये धडक होऊन अपघात झाला असून यात एक्स्प्रेसच्या इंजिनसह 4 डबे रुळावरून घसरले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही
नेमकं काय घडलं?
अजमेरमधील मदार रेल्वे स्थानकावर आज पहाटे साबरमती-आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्यानं हा भीषण अपघात झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोको पायलटनं ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन ब्रेकही लावला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. दोन गाड्या एकमेकांसमोर आल्या आणि अपघात झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस मालगाडीला धडकल्यानं इंजिनसह जनरल डब्यातील चार डबे रुळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी पोहोचलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत जीवीतहानी झालेली नाही. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी अजमेर स्थानकात नेण्यात आलं आहे. झोपेत असताना अचानक मोठा आवाज आल्याचं प्रवाशांनी सांगितलं. यानंतर ट्रेन रुळावरून घसरली.















Discussion about this post