नवी दिल्ली ।तुम्ही ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरंतर ओला कंपनीने ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने S1 मॉडल्सवर 25,000 रुपयांपर्यंतची सवलत दिलेली आहे. ही ऑफर 31 मार्चपर्यंत असणार असून तुम्हाला स्वस्त किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
ओलाने S1 रेंज इलेक्ट्रिक स्कूटर्सवर कंपनीने बंपर डिस्काऊंट जाहीर केलं तुमची 25,000 रुपयांपर्यंतची बचत होईल. या डिस्काऊंट ऑफरसह कंपनी स्कूटर खरेदीवर वाढीव वॉरंटीचा लाभ पण देणार आहे.
Ola चे डिस्काउंट ऑफर्स
Ola S1 Pro Gen 2 : ओला इलेक्ट्रिक नुसार, त्यांची लोकप्रिय ओला एस1 प्रो जेन 2 ची एक्स शोरुम किंमत 1.47 लाख रुपये आहे. पण डिस्काऊंटसह ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना 1.29 लाख रुपयांमध्ये मिळेल. ग्राहकाला या स्कूटरवर 17,500 रुपये बचत करता येईल.
Ola S1 Air : ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे पण स्वस्त झाले आहे. या स्कूटरची किंमत 1.04 लाख रुपये आहे. पूर्वी ही इलेक्ट्रिक स्कूटर 1.19 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) मिळत होती.
Ola S1 X+ : सर्वाधिक सवलत ओला एस1 एक्स प्लस स्कूटरवर मिळत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 25,000 रुपयांच्या सवलतीसह मिळत आहे. या स्कूटरची मूळ एक्स-शोरूम किंमत 1.09 लाख रुपये आहे. सध्या ही स्कूटर 84,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज जोरदार आहे. ओला एस1 प्रो एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 195 किमीचे अंतर कापते. या स्कूटरची टॉप स्पीड 120 किमी/प्रति तास आहे. सिंगल चार्जमध्ये ओला एस1 एयर 151 किमी रेंज देते. तर ओला एस1 एक्स प्लस फुल चार्जमध्ये 151 किमीचे अंतर कापते. तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत डिस्काऊंट ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.















Discussion about this post