बारामती । बारामतीत आज सरकारचा नमो रोजगार मेळावा पार पडला असून यावेळी उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली, पण ती शरद पवार गटाच्या विरोधात केली नाही. तर, फडणवीस यांनी थेट अजितदादांनाच चिमटे काढले. अजितदादा यांना गृहमंत्रीपद देण्यास जाहीरपणे नकारही दिला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
काय म्हणाले फडणवीस?
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. तुम्ही काम करा पण गृहखातं मिळणार नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. बारामतीत रोजगार मेळावा आयोजित केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केलं.
रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळून दिली. अधिसुचित केलेल्या सुचनेपेक्षा आलेले अर्ज कमी आहेत. अर्ज ३६ हजार आली आहेत, तर पदे ५५ हजार आहेत. यामुळे उमेदवारांना नोकरी मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.राज्यातील तरुणांना रोजगार हवा या मेळाव्यातून रोजगार मागणारे आणि देणारे एकत्र आलेत. अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या मेळाव्यापूर्वी अजित पवार यांच्या प्रयत्नाने बारामतीत बांधणात आलेले अत्याधुनिक बस स्टँड, पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय आणि पोलिसांच्या निवासी इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं. एखाद्या कार्पोरेट ऑफिसमध्ये आल्याचा भास व्हावा असं पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन बांधण्यात आलं आहे. पोलिसांच्या निवासी इमारतीही हायफाय बांधण्यात आल्या आहेत. अजितदादांच्या या कामाचं देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केलं.















Discussion about this post