जळगाव । जळगावसह राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत असून हे अवकाळीचे सावट कायम आहे. दरम्यान हवामान खात्याने आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. इतकंच नाही तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
या जिल्ह्यांना इशारा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज शनिवारी देखील दुपारी ४ वाजेनंतर ३० ते ४० किमी वेगाने वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.















Discussion about this post