मुंबई : आगामी निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत असून अशातच काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार पडलं आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपात जाणार आहे.या नेत्याने पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
ते आज सकाळी 11 वाजता भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. बसवराज पाटील हे काँगेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत. त्यांचं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर या भागात प्राबल्य आहे.















Discussion about this post