Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्याचा आर्थिक विकास दर वाढविण्याची जबाबदारी बँकाची – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव जिल्ह्याचा राज्यातील विकासाचा वाटा फक्त 2.4 टक्के

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 24, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्याचा आर्थिक विकास दर वाढविण्याची जबाबदारी बँकाची – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्ह्याचा आर्थिक विकासदराची राज्यस्तरीय तुलना करायची झाली तर फक्त 2.4 टक्के आहे. तो दर वाढविण्याची गरज असून ती जबाबदारी बँकांची आहे. बँक अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुणवत्तापूर्ण व्यावसायिक वाढ करण्याचा निश्चय केला तर ते शक्य आहे. त्यासाठीच आजची कार्यशाळा आयोजित केली असून जिल्हा प्रशासन तुमच्या मदतीला आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

कांताई हॉल येथे बँकासाठी आयोजित धनसंवर्धन कार्यशाळेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रणवकुमार झा,बैंक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण सिंह, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, बैंक ऑफ बड़ौदाचे सचिन देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री अंतुर्लीकर, जिल्हा उपनिबंधक गौतम बालसाने हे उपस्थित होते. जळगाव जिल्ह्याला पारंपारिक बँकिंग संस्कृती आहे. एकेकाळी सोन्याच्या ठेवीच्या बदल्यात कर्ज देण्याची पद्दत होती. त्यामुळे जळगावला सुवर्ण नगरी म्हणून ओळख आहे. यासाठी थोड्या प्रयत्नाची गरज आहे, ते प्रयत्न केले तर हे दिवस पलटू शकतात.

बँकेत माणसं उभी करण्याची ताकत
शासनाने कितीही ठरवले तरी बँकेच्या सक्रीय सहभागाशिवाय आर्थिक विकास शक्य नाही हे सांगून आपण पुण्यात असताना बँकेमुळे मी उभं राहिलो असे सांगणारे लोकं मला भेटायची. जळगाव जिल्ह्यात मला अशा यश कथा सांगणारे फारसे दिसत नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे. माणसं आर्थिक दृष्ट्या उभं करणं हे तुमचं काम आहे, त्यासाठी स्मार्ट काम करा. शासकीय कागद पत्राची अडचणी येत असतील तर जिल्हा प्रशासनाला सांगा आम्ही मदत करू. पण जळगावचे हे चित्र तुमच्या सहकार्याने बदलायचे आहे असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.

जळगाव जिल्ह्यात विकासाची क्षमता
जळगाव जिल्ह्यात विकासाची मोठी क्षमता आहे. जळगावची केळी, प्लास्टिक, दाळ निर्यात होते. त्यामानाने कृषी बँकिंगची स्थिती चांगली आहे. पण म्हणावे तेवढे प्रक्रिया उद्योग, सेवा उद्योगात बँकाचा रोल अधिक सकारात्मक दिसत नाही. जळगावकरांना स्पर्धेत उतरावं लागेल, एकेकाळी देशाच्या मार्केट मध्ये 12 केळी मागे 3 जळगावची असायची आता हे प्रमाण घसरून 6 केळीत एक केळी जळगावची आहे. याचा विचार होणं गरजेचं असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा निवडणुकित सहकार्याची अपेक्षा
येणाऱ्या लोकभा निवडणुका पारदर्शक होण्यासाठी बँकेचा रोल महत्वाचा असणार आहे. बँकेत येणाऱ्या रक्कमेवर लक्ष ठेवण्यापासून ते निवडणुकित होणाऱ्या आर्थिक गैर व्यवहार रोखण्यासाठी आणि नियंत्रणासाठी ज्या टीम लागतात त्यात तुमच्या पैकी अनेकांचे सहकार्य लागेल, ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यात सहभागी व्हा असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

जळगाव जिल्ह्याचा पुढच्या काही वर्षाचा धोरणात्मक विकासाचा आराखडा सांगताना जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे म्हणाले, जिल्ह्यात रियल इस्टेट आणि सोने व्यवहारात वाढ दिसत असली तरी इतर क्षेत्रात मात्र अधोगती आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, सेवा उद्योग यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित करत यात बँकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे नमुद केले. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रणवकुमार झा यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यशाळेमागची भूमिका विशद केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांना नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी !

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत गिरीश महाजनांनी पुन्हा मोठं भाकीत वर्तवलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत गिरीश महाजनांनी पुन्हा मोठं भाकीत वर्तवलं

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page